पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या कार्यालयावर हल्ला

December 11, 2012 3:15 PM0 commentsViews: 18

11 डिसेंबर

मुंबईत काल रात्री वरळी इथं मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागाच्या ऑफिसवर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. 20 ते 25 जणांच्या जमावानं ऑफिसची तोडफोड केली. तसंच इथं असलेल्या तीन कर्मचार्‍यांनाही मारहाण करत अत्यावश्यक सेवेतील पाच गाड्यांची तोडफोड केली. या गाड्यांमध्ये अतिक्रमण विरोधी कारवाईचे सामान होते. पोलिसांनी काही हल्लेखोरांनी अटक केलीय, पण त्यांनी हा हल्ला का केला आणि ते कोणत्या पक्षाशी किंवा संघटनेशी संबंधित आहेत हे अजून समजू शकलेलं नाही.

close