सुरेश जैन यांना सरकार वाचवतंय -अण्णा हजारे

November 30, 2012 10:53 AM0 commentsViews: 4

30 नोव्हेंबर

घरकूल घोटाळ्यात अटकेत असलेले माजी मंत्री सुरेश जैन यांना सरकार वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केला आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पत्र पाठवून अण्णा हजारे यांनी हा आरोप केला आहे. सुप्रीम कोर्टाने जामीन नाकारल्यानंतर आता सरकारी वकील बदलण्याचे प्रयत्न सुरू आहेत असा आरोपही अण्णांनी केला. प्रकृती चांगली नसल्याचे कारण देवून सुरेश जैन सध्या सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे तीथं त्यांना विशेष वागणूक मिळत असून त्याची चौकशी करावी अशी मागणीही अण्णांनी आपल्या पत्रात केली आहे.

close