स्मारक प्रश्नी शिवसेना नेत्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

December 11, 2012 5:08 PM0 commentsViews: 7

10 डिसेंबर

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाबद्दल शिवसेना नेत्यांनी मंगळवारी रात्री मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली. या भेटीत शिवसेनेनं तीन प्रस्ताव सादर केले आहे. यामध्ये बाळासाहेबांचं स्मारक महापौर बंगला आणि पार्क क्लबच्या मोकळ्या जागेत व्हावे, नवी मुंबईतील विमानतळाला बाळासाहेबांचं नाव देण्यात यावं आणि साहेबांच्या नावे टपालाचे तिकीट काढण्यात यावे अशा मागण्या शिवसेनेनं मुख्यमंत्र्यांकडे केल्या आहेत. या बैठकीला शिवसेनेचे नेते सुभाष देसाई, महापौर सुनील प्रभू आणि मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. या प्रश्नी सेना नेते आणि मुख्यमंत्र्यांमध्ये अर्धा तास चर्चा झाली.

शिवसेनेचे मुख्यमंत्र्यांकडे तीन प्रस्ताव

- महापौर बंगला आणि पार्क क्लबच्या मोकळ्या जागेत स्मारक- नवी मुंबईतील विमानतळाला बाळासाहेबांचं नाव- बाळासाहेबांच्या नावे टपाल तिकीट काढण्यात यावे

close