कुख्यात गुंड शरद मोहोळचा उपसरपंचपदासाठी अर्ज दाखल

December 7, 2012 3:29 PM0 commentsViews: 69

07 डिसेंबर

इंडीयन मुजाहिद्दीन या अतिरेकी संघटनेचा अतिरेकी आणि कातील सिद्दकी खून प्रकारणातला आरोपी शरद मोहोळ यांनं मुठा गावच्या ग्राम पंचायतीच्या उपसरपंचपदासाठी निवडणूक अर्ज दाखल केलाय. कुख्यात गुंड शरद मोहोळवर अनेक गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे मुठा ग्राम पंचायती अतंर्गत शरद मोहोळ याच्या विरोधात कुणीही निवडणुकीत उभं नसल्यानं तो बिनविरोध निवडून येणं जवळपास निश्चित झालंय. शरद मोहोळ हा सद्या पुण्यातील येरवडा तुरूंगात आहे. या निवडणुकीसाठी शरद मोहोळ यांनं तुरूंगातूनच निवडणुकीचा अर्ज दाखल केलाय अशी माहिती पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक विजयकूमार मगर यांनी दिली.

close