आढावा 89 व्या नाट्यसंमेलनाच्या कार्यक्रमांचा

December 3, 2008 2:29 PM0 commentsViews: 2

3 डिसेंबर, मुंबई माधुरी निकुंभयंदाचं 89 वं अखिल भारतीय नाट्यसंमेलन जानेवारी महिन्यात बीड येथे भरणारेय. या नाट्यसंमेलनात अनेक वेगवेगळे उपक्रम राबवण्याचा नाट्य मंडळाने निर्णय घेतला आहे. 30 जानेवारी , 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारीला बीड इथे होणा-या नाट्यसंमेलनात तीन दिवसांमध्ये नाटकांची रेलचेल असणारेय. 30 तारखेच्या पूर्व संध्येला बीड जिल्ह्यातले स्थानिक लोक त्यांची कला सादर करतील. त्यानंतर महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमाचं बदलेलं रुप पुन्हा एकदा नाट्यसंमेलनात प्रेक्षकांसमोर येईल. त्यासोबतच संगीत नाटकांची उतरती कळा चालू असतानाच या नाट्यसंमेलनात 2 संगीत नाटकंही यावेळी सगळ्यांसाठी आकर्षणाचा भाग ठरतील. एकूण 18 एकांकिका आणि 5 बालनाटकांचा समावेश केला गेलाय.या व्यतिरिक्त यावर्षीपासुन नाट्यसंमेलनात एक नवा एलिमेण्ट अ‍ॅड होणारेय. त्यात वेगवेगळ्या मोठ्या कलाकारांवर जवळ जवळ तासाभराच्या डॉक्युमेंण्ट्री बनवल्या आहेत आणि संपूर्ण संमेलनादरम्यान या डॉक्युमेण्ट्री दाखवल्या जाणारेत.यासोबतच भारतीय सणवार आणि त्याच्याशी जोडलेलं स्त्रियांचं नातं यावर मुंबईच्या ग्रुपनं उठी उठी गोपाळा नावाचा एक आगळा वेगळा कार्यक्रम तयार केलाय. यावेळी तो सगळयांसाठी सादर केला जाणारेय. नाट्यसंमेलनात सादर केल्या जाणा-या कार्यक्रमांची माहिती नाट्यपरिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी केली.

close