..तर ऍशलेटिक्स इंडियावर बंदी

December 11, 2012 5:24 PM0 commentsViews: 3

11 डिसेंबर

भारतीय क्रीडाक्षेत्राला आज आणखी एक मोठा धक्का बसलाय. ऍथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाला घटनेत सुधारणा करून नव्यानं निवडणूक घेण्यासाठी 60 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. असं न केल्यास त्यांच्यावर बंदी ठोठावण्याचा इशारा केंद्रीय क्रीडा मंत्रालयानं दिला आहे. आता अध्यक्षपदी असलेले अध्यक्ष, सचिव आणि खजिनदार यांना अपात्र ठरवण्यात आलंय. बॉक्सिंग आणि तिरंदाजीनंतर ऍथलेटिक्स ही केंद्रीय क्रीडा खात्याकडून कारवाई करण्यात आलेली तिसरी संघटना ठरलीय. ऍथलेटिक्स फेडरेशनवर क्रीडा मंत्रालयानं निवडणुकांमध्ये फेरफार केल्याचा ठपका ठेवला आहेत.

close