शिवाजी पार्कवर चौथार्‍याला शिवसैनिकांचं सुरक्षाकडं

December 8, 2012 9:56 AM0 commentsViews: 6

08 डिसेंबर

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा प्रश्न तुर्तास मिटला असला तरी शिवाजी पार्कवरच समाधीस्थळ असावे या मागणीसाठी शिवसैनिक शिवाजी पार्कवर मोठ्या संख्येनं जमले आहे. मुंबई, ठाण्यातून शेकडो शिवसैनिक शिवाजी पार्कवर दाखल झाले आहे. ठाण्याचे आमदार एकनाथ शिंदे,प्रताप सरनाईक,राजन विचारे यांच्या नेतृत्वाखाली सध्या हे शिवसैनिक शिवाजी पार्कवर जमले आहेत. बाळासाहेबांवर ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार झाले त्या चौथर्‍याचं रक्षण करण्यासाठी हे शिवसैनिक शिवाजी पार्कवर दाखल झाले आहे. शिवाजी पार्कवर स्मारक जरी उभारले जाणार नसले तरी समाधीस्थळ म्हणून शिवाजी पार्कच राहीली पाहिजे अशी मागणी शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली होती. बाळासाहेबांच्या अंत्यसंस्कारासाठी शिवसेनाला एकच दिवस मैदान देण्यात आले होते. शिवाजी पार्कवरील चौथरा शिवसेनेनं हटवून घ्यावा अन्यथा पालिकेनं कारवाई करावी अशी नोटीस पालिका महापौर आणि राऊत यांना देण्यात आली आहे.नोटीसीचा कालावधी संपला तरी चौथरा हटवलेला नाही. दरम्यान शिवाजी पार्कवरील चौथरा हा लाखो शिवसैनिकांच्या भावनेचा प्रश्न असून आम्ही तो हटवणार नाही आणि सरकारनंही तो हटवण्याचा प्रयत्न करु नये असा इशाराच खासदार संजय राऊत यांनी दिलाय.

close