‘एफडीआय’ला लोकसभेत मंजुरी

December 5, 2012 3:44 PM0 commentsViews: 4

05 डिसेंबर

थेट परकीय गुंतवणुकीच्या मुद्यावरून गेली दोन दिवस लोकसभेत चालेल्या 'मंथना'नंतर अखेर युपीए सरकारने बाजी मारत एफडीआयला लोकसभेत मंजुरी मिळाली आहे. एफडीआयविरोधात भाजपच्या नेत्या सुषमा स्वराज यांनी दाखल केलेल्या प्रस्तावावर आज मतदान घेण्यात आले. या मतदानात सरकारच्या पारड्यात 253 मत पडली तर एनडीएला 218 मतच मिळू शकली. विशेष म्हणजे ऐन मतदानाच्या वेळी युपीएच्या घटक पक्ष सपा आणि बसपाने वाकआऊट केल्यामुळे युपीएला सहज विजय संपादन करता आला. या विजयानंतर पंतप्रधान मनमोहन सिंग आणि पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी आनंद व्यक्त केला. तर सरकारचा हा नैतिक पराभव आहे अशी टीका विरोधकांनी केली आहे. फेमा कायद्यातल्या दुरुस्तीवरही यानंतर मतदान झालं. हा प्रस्तावही फेटाळला गेला.उद्या आणि परवा राज्यसभेत एफडीआयवर चर्चा होईल आणि त्यानंतर मतदान होईल.

close