सोमय्या यांचे आरोप प्रसिद्धीसाठी -भुजबळ

November 30, 2012 12:51 PM0 commentsViews: 4

30 नोव्हेंबर

भाजपचे आमदार किरीट सोमय्यांचे आरोप केवळ प्रसिद्धीसाठी स्टंट आहे. ते नेहमी कोणावरही कोणतेही आरोप करतात त्यांनी सिंचन घोटाळ्यावर आरोप केला. समीर,पंकजवर आरोप केले. मी याही अगोदर म्हणालो आहे आरोप सिद्ध झाले तर राजकारण सोडून देईन आताही तेच म्हणतो मी कुठल्याही चौकशीला तयार आहे असं प्रतिउत्तर सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी दिलं. तसंच राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरींवर आरोप झाले तेंव्हा हे सोमय्या कुठे तरी गायब का झाले होते अशा खोचक टोलाही लगावला. गुरुवारी किरीट सोमय्या यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. तीन वर्षात भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयांची संपती 21 कोटींवरून 2100 कोटींवर गेली असा खळबळजणक आरोप केला होता.

close