मराठा आरक्षणाचा प्रस्ताव विचारधीन

December 8, 2012 10:10 AM0 commentsViews: 20

08 डिसेंबर

केंद्र सरकारने मराठा आरक्षणाबद्दलचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचं मान्य केलंय. केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री डी नेपोलियन यांनी असा प्रस्ताव आल्याचं लोकसभेत लेखी उत्तरात मान्य केलंय. मराठा या वर्गाला ओबीसींच्या श्रेणीत समाविष्ट करावं यासाठी हा प्रस्ताव आलाय असं डी नेपोलियन यांनी सांगितलं आहे. हा प्रस्ताव एनसीबीसी (NCBC) म्हणजेच नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस यांच्याकडे सल्ल्यासाठी पाठवला गेलाय. 27 एप्रिल 2012 ला हा प्रस्ताव केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाने सल्ल्यासाठी एनसीबीसीकडे पाठवलाय. इचलकरंजीचे खासदार राजू शेटट्ी यंाना दिलेल्या लेखी उत्तरात डी नेपोलियन यांनी ही माहिती दिली आहेत. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करावं यासाठी गेली काही वर्ष महाराष्ट्रात लढा सुरू आहे. असं असताना केंद्र सरकारने एनसीबीसीकडे पाठवलेला हा प्रस्ताव यासंदर्भातलं महत्वाचं पाऊल म्हणता येईल.

close