अविश्वास प्रस्तावाबाबत गटनेत्यांची बैठक निष्फळ

December 10, 2012 4:23 PM0 commentsViews: 5

10 डिसेंबर

शिवसेनेने सादर केलेला अविश्वास प्रस्ताव विधानसभेत चर्चेसाठी मंजूर करायचा की नाही, हे ठरवण्यासाठी गटनेत्यांची बैठक झाली. पण हा अविश्वास ठराव विधानसभेत सादर करण्यासाठी सर्व गटनेत्यांची संमती आवश्यक आहे, अशी भूमिका विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी घेतली. त्यामुळे आज झालेली गटनेत्यांची बैठक निष्फळ ठरली. कारण मनसेने या प्रस्तावाला विरोध केलाय. आमच्याकडे 29हून जास्त सदस्य असल्यामुळे आमचा प्रस्ताव चर्चेसाठी मांडावा असा आग्रह शिवसेनेचा आहे. याबद्दलचा निर्णय अध्यक्षांनी राखून ठेवला. याच मुद्द्यावर उद्या पुन्हा बैठक होणार आहे.

close