पाण्याचा अपव्यय करणार्‍यांवर फौजदारी गुन्हा

December 13, 2012 3:20 PM0 commentsViews: 61

13 डिसेंबर

मराठवाड्याला भेडसावत असलेल्या पाणी प्रश्नावर औरंगाबाद महानगरपालिकेनं कडक पाऊल उचले आहे. पाण्याचा अपव्यय करणार्‍यावर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश औरंगाबाद महापालिकेचे आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी दिले आहेत. मराठवाडयामध्ये सध्या दुष्काळी स्थिती आहे. त्यातच नगर आणि नाशिकमधून मिळालेल्या 5 टीएमसी पाण्यावर औरंगाबाद शहराचा पाणीपुवरठा अवलंबून आहे. याच पाण्यावर आणखी 6 महिने तरी औरंगाबादचा पाणीपुरवठा अवलंबून आहे, त्यामुळं पाण्याचा कोणताही गैरपावर होऊ नये यासाठी कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिलेत. शिवाय बांधकाम करण्यावरही कारवाई करण्यात येणार आहे.

close