मोदींनी गुन्हेगारांनाच पाठीशी घातलं -सोनिया गांधी

December 10, 2012 5:53 PM0 commentsViews: 4

10 डिसेंबर

गुजरात विधानसभेचा प्रचार आता शिगेला पोहोचलाय. रविवारी पंतप्रधानांनी केलेल्या टीकेनंतर आज सोनिया गांधी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर तोफ डागली. पण विशेष म्हणजे या टीकेत गुजरातमधल्या 2002 साली झालेल्या दंगलींचा थेट उल्लेख त्यांनी केला नाही. गुजरातमध्ये कायदा आणि सुव्यस्था नावाची गोष्टच नसल्याची टीका गांधी यांनी केली. भाजप आणि काँग्रेस एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीये.रविवारी पंतप्रधानांनी गुजरातमध्ये अल्पसंख्यांक लोक सुरक्षित नसल्याचा आरोप केला होता. तर त्याला प्रत्युत्तर देताना मोदी यांनी पंतप्रधान व्होट बँकेचं राजकारण खेळत असल्याचा आरोप केलाय.

close