उद्धव ठाकरे 3 डिसेंबरपासून राज्याच्या दौर्‍यावर

November 30, 2012 3:08 PM0 commentsViews: 1

30 नोव्हेंबर

शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे येत्या 3 डिसेंबरपासून महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. बाळासाहेबांच्या निधनानंतर हा त्यांचा पहिलाच दौरा असेल. 3 डिसेंबर ते 17 डिसेंबरच्या दरम्यान ते ठाणे, नाशिक, औरंगाबाद, रत्नागिरी आणि कोल्हापूर इथं सभा घेणार आहे. तसेच ठिकठिकाणच्या पक्षाच्या पदाधिकार्‍यांना आणि कार्यकर्त्यांच्या भेटीही घेणार आहे. शिवसेनाप्रमुख आजारी असताना राज्यभरातून हजारो शिवसैनिक मातोश्रीवर आले होते मात्र सुरक्षेच्या कारणास्तव उद्धव यांची भेट होऊ शकली नाही या दौर्‍याच्या निमित्ताने या सर्व कार्यकर्त्यांना उद्धव भेटतील असं सेनेच्या नेत्यांनी सांगितलं आहे.

close