शिवसेनेला धक्का, अविश्वास प्रस्ताव रद्द

December 12, 2012 10:05 AM0 commentsViews: 7

12 डिसेंबर

नागपूर अधिवेशनात तिसर्‍या दिवशी शिवसेनेला धक्का बसलाय. आघाडी सरकार विरोधात दाखल केलेल्या अविश्वास प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी रद्द केला आहे. तांत्रिक कारणामुळे हा प्रस्ताव रद्द करण्यात आल्याचं विधानसभा अध्यक्षांनी सांगितलं. राज्य सरकारविरोधात शिवसेनेनं अविश्वास प्रस्ताव सादर केला होता. पण यावरुन विरोधकांमध्येच एकजूट नव्हती. मनसे आणि भाजपनं शिवसेनेच्या या अविश्वास प्रस्तावाला विरोध केला होता. त्यामुळे आता हा प्रस्ताव रद्द झाल्यानं शिवसेनेला हा धक्का मानलं जातंय. तर अविश्वास प्रस्ताव आणण्याची ही वेळ नव्हती असं मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे.

close