सिंचनात फक्त 0.1 टक्केच वाढ

December 13, 2012 4:14 PM0 commentsViews: 2

13 डिसेंबर

जलसंपदा खात्यानं सिंचनाची श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली. त्यामध्ये गेल्या 10 वर्षांत 0.1 टक्के नाही तर 5.17 टक्क्यांनी सिंचनाची टक्केवारी वाढल्याचा दावा करण्यात आला होता. पण आता हा दावा कृषी खात्यानं खोडून काढलाय. काँग्रेसकडे असलेल्या कृषी खात्यानं सिंचन श्वेतपत्रिकेबाबतची आपली नोट मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सादर केलीय. ही नोट म्हणजे कृषी खात्याची हिरवी पत्रिका आहे. त्यामध्ये 2010-11 च्या वार्षिक अहवालाची आकडेवारी खरी असून त्यानुसार 2000-01 ते 2009-10 पर्यंत सिंचनाची टक्केवारी 17.8 वरून 17.9 इतकी झाली, याचाच अर्थ गेल्या दहा वर्षांत सिंचनाची टक्केवारी 0.1 टक्क्यांनी वाढल्याचं नमूद करण्यात आलंय. एवढंच नाही तर सिंचन विभागाच्या दोन्हीही अहवालांमध्ये सिंचन क्षेत्राच्या आकडेवारीबाबत फरक असून महसूल, कृषी आणि सिंचन विभागाची आकडेवारी ही वेगवेगळ्या प्रकारे वाढलेली आहे. ती एकमेकांशी जुळलेली दिसत नाही. याविषयावर गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अंदाजपत्रकावर चर्चा होत असतानाही विधानसभा सदस्यांनी चिंता व्यक्त केली होती, असे ताशेरे कृषी विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर सुधीर गोयल यांच्या सहीनिशी दिलेल्या कृषीविभागाच्या नोटमध्ये म्हटलंय.

close