भारतावर पराभवाचे सावट कायम

December 8, 2012 12:50 PM0 commentsViews: 4

08 डिसेंबर

दुसर्‍या कसोटीत लाजिरवाण्या पराभवानंतर कोलकाता टेस्टमध्येही भारताची अवस्था बिकट आहे. भारतानं डावानं पराभव टाळला असला तरी पराभवाचं सावट मात्र अजूनही कायम आहे. चौथ्या दिवसअखेर 239 रन्सवर भारताच्या 9 विकेट्स गेल्या आहेत. बिनबाद 89 अशा चांगल्या सुरूवातीनंतर अवघ्या अर्ध्या तासात भारताचा डाव पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. भारताचे तळाचे बॅट्समन्स भारताचा लाजिरवाणा पराभव टाळण्याचा प्रयत्न करत आहेत. आर. आश्विन एकाकी झुंज देतोय. त्यानं शानदार हाफ सेंच्युरी ठोकलीय. नवव्या विकेटसाठी त्याने ईशांत शर्मासोबत 38 रन्सची पार्टनरशिप केलीय. आश्विन 83 तर प्रग्यान ओझा 3 रन्सवर खेळत आहे. आश्विनच्या सेंच्युरीकडे आता भारतीय क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलंय. यापुर्वी आश्विननं विंडीजविरुध्द 103 रन्सची शानदार शतकी खेळी केली आहे.

close