जळगाव नव्हे ‘सौर’गाव, सौरऊर्जा वीजनिर्मिती प्रकल्पाची मुहूर्तमेढ

December 13, 2012 4:23 PM0 commentsViews: 14

13 डिसेंबर

राज्यातील सगळ्यात मोठा सौरऊर्जा निमिर्ती प्रकल्प जळगावला कार्यान्वित झाला आहे. या सोलर फोटोव्होल्टीक प्लॅन्टमध्ये साडेआठ मेगावॅट वीज निमिर्ती होणार आहे. भवंरलाल जैन यांच्या हस्ते या प्लॅन्टचं उद्घाटन करण्यात आलं. या प्रकल्पामुळे वीज निर्मिती करताना कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन वाचणार असल्यानं पर्यावरण रक्षणासाठी हा प्रकल्प फायदेशीर ठरणार आहे. जैन ग्रीन एनर्जीचा हा प्रकल्प 42 एकर पडीक जमिनीवर उभारण्यात आला आहे. वीजनिमिर्तीसाठी 38 हजार 900 पॅनल्सचा उपयोग करण्यात आला असून वर्षाला 1 कोटी 40 लाख युनिट्सची वीजनिर्मीती या प्लॅन्टच्या माध्यमातून होणार आहे. या सोलर वीजनिर्मीतमुळं औष्णीक वीजनिर्मीतीसाठी लागणा-या 14 हजार मेट्रीक टन कोळश्याची बचत होणार आहे. गुजरातमध्येही नदीपात्रावर असाच प्रकल्प उभारण्यात आला आहे. त्याच धर्तीवर हा प्रकल्प उभारण्यात आला आहे या प्रकल्पामुळे महाराष्ट्राला एक वेगळी ओळख प्राप्त झालीय.

close