वॉलमार्ट लॉबिंग प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करा -सिन्हा

December 11, 2012 9:34 AM0 commentsViews: 6

11 डिसेंबर

वॉलमार्ट लॉबिंग प्रकरणी विरोधकांनी संसदेत गोंधळ घातला. वॉलमार्ट प्रकरणामुळे भारताची प्रतिष्ठा धुळीला मिळाली असून याप्रकरणाची न्यायालयीन चौकशी करा अशी मागणी भाजपचे जेष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी लोकसभेत केली. ही सगळी चौकशी 60 दिवसात पूर्ण करून या प्रकरणातील सत्य लोकांसमोर आलं पाहिजे अशी मागणीही सिन्हा यांनी केली. तर लॉबिंग प्रकरणाची सरकारने गंभीर दखल घेतली असून याप्रकरणी चौकशी करून सत्य लोकांसमोर आणलं जाईल अशी घोषणा संसदीय कामकाज मंत्री कमलनाथ यांनी लोकसभेत केली आहे.

close