छेडछाडीला कंटाळून आत्महत्या

December 6, 2012 5:25 PM0 commentsViews: 10

6 डिसेंबरडोंबिवलीतली घटना ताजी असतानाच छेडछाडीला कंटाळून ठाणे जिल्ह्यात एका मुलीनं आत्महत्या केल्याची घटना घडलीये. ठाणे जिल्ह्यातल्या विक्रमगड तालुक्यातल्या पोटकळ इथल्या 15 वर्षांच्या विद्यार्थीनीनं गळफास घेऊन आत्महत्या केलीय. हर्षला गडग असं या मुलीचं नाव आहे. हर्षला गुरुवारी दुपारी मैत्रीणींसह शाळेत जात असताना प्रवीण गोरखणा यानं छेडछाड केली. त्यामुळे हर्षलानं घरी येऊन आत्महत्या केली. प्रवीण यानं यापूर्वीही हर्षलाला छेडलं होतं. याप्रकरणी विक्रमगड पोलिसांनी प्रवीण याला अटक केलीय.

close