डिझेलची बिल थकल्यामुळे तहसीलदारांचे हाल

December 8, 2012 12:58 PM0 commentsViews: 2

08 डिसेंबर

पुण्यातील तहसीलदारांची सरकारी गाड्याची डिझेलची बिल थकल्यानं तहसीलदारांना आपल्या प्रशासकीय कामकाजा करिता स्वत:च्या खासगी दुचाकीवरून फिरण्याची वेळ आली आहेत. डिझेलची बिलं थकल्यानं पुण्यातील तहसीलदारांनी आपली सरकारी वाहनं पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात आणून उभी केली आहेत. प्रशासकीय कामकाजाकरिता तहसीलदारांच्या वाहनासाठी 90 हजार रूपयाच्या डिझेलची तरतूद आहे. मात्र डिझेलच्या खर्चासाठी 17 लाख रूपयाची मागणी होतेय. डिझलेची बिल थकली असल्यांनं डिझेलपुरवठादारांनीही डिझेल पुरवठा करण्यास नकार दिलाय.

close