सरकारविरोधात लाखो मुंबईकर रस्त्यावर

December 3, 2008 3:50 PM0 commentsViews: 2

3 डिसेंबर, मुंबई मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला एक आठवडा पूर्ण झालाय. हा हल्ला रोखण्यात अपयशी ठरलेल्या सरकारविरोधात मुंबईकर रस्त्यावर आले. विशेष म्हणजे कुठल्याही एनजीओ किंवा राजकीय पक्षाच्या बॅनरखाली ही लाखभर लोक एकत्र आली नव्हती. अतिरेकी हल्ल्याबाबत गुप्तचर संस्थाकडून वारंवारं सूचना देऊनही सरकारनं कोणतंही पाऊल उचललं नाही. त्यामुळे निरपराध लोकांना जीव गमवावा लागला. सरकारविरोधातील हा रोष गेट वे ऑफ इंडियाजवळ एकत्र आलेल्या लोकांमध्ये दिसत होता. विविध महाविद्यालयाचे कॉलेज विद्यार्थी आणि एनएनसी कॅडेट हातात फलक घेऊन उभे होते. ' वुई सॅल्यूट ब्रेव्ह हार्ट ', ' हम सब एक है ' असे पोस्टर्स लोकांच्या हातात होते. दक्षिण मुंबईत हॉटेल ताजच्या समोरील गेट वे ऑफ इंडियाच्या परिसरात नागरिकांनी सरकारविरोधात हा मोर्चा काढला. विशेष म्हणजे मुंबईकरांनी एकमेकांना एसएमएस करुन गेट वे ऑफ इंडियाला एकत्र येण्याचं आवाहन केलं होतं. त्या आवाहनाला नागरिकांनी भरभरुन प्रतिसाद दिला.

close