विजय दिनासाठी शिवाजी पार्क लष्कराच्या ताब्यात

December 11, 2012 9:43 AM0 commentsViews: 6

11 डिसेंबर

शिवाजी पार्कवरील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्यसंस्काराच्या जागेचा वाद पेटला असताना लष्कराचा विजय दिनासाठी उद्यापासून शिवाजी पार्कचं मैदान ताब्यात घेतलं जाणार आहे. आज नौदलाच्या अधिकार्‍यांनी शिवाजी पार्क मैदानाची पाहणी केली. या मैदानातील बाळासाहेब यांचा अंत्यविधी झालेला चौथरा आणि क्रिकेट पीचची जागा सोडून लष्कराचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलंय. 15 आणि 16 डिसेंबरला या मैदानावर लष्कराचं भरणार प्रदर्शन आहे.

close