‘गंभीर स्वत:साठी खेळतो’

December 12, 2012 11:49 AM0 commentsViews: 7

12 डिसेंबर

नागपूर टेस्टच्या पूर्वसंध्येलाच टीम इंडियामधील आणखी एक वाद उफाळून आला. 'क्रिकेट नेक्स्ट डॉट कॉम' या वेबसाईटनं दिलेल्या बातमीनुसार कॅप्टन महेंद्र सिंग धोणीनं गौतम गंभीरची बोर्डाकडे तक्रार केल्याचं कळतंय. गंभीरच्या एकूणच वागण्याबद्दल धोणीनं बोर्डाकडे नाराजी व्यक्त केली आहे. वेबसाईटनं भारतीय टीममधील एका खेळाडूचं नाव न घेता ही बातमी दिलीये. त्या खेळाडूच्या म्हणण्याप्रमाणे गंभीर हा टीमसाठी नाही तर स्वतःसाठी खेळतो असा आरोप धोणीनं केला. मुंबई टेस्टमध्ये गंभीरनं स्वार्थी खेळी केली जेव्हा टीमला आणि तळाच्या बॅट्समनना त्याची गरज होती त्यावेळी त्यानं स्ट्राईक आपल्याकडे ठेवला नाही. तर गंभीरच्या नजीकच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गंभीर हा कॅप्टनपदासाठी प्रमुख प्रतिस्पर्धी असल्यानं धोणीनं गंभीरविरुद्ध तक्रार केली आहे.

close