‘झी’चे मालक सुभाष चंद्र यांची क्राईम ब्रांचकडून चौकशी

December 8, 2012 1:02 PM0 commentsViews: 4

08 डिसेंबर

झी ग्रुपचे मालक सुभाषचंद्र आणि एमडी पुनीत गोएंका आज दिल्ली क्राईम ब्रांचपुढे हजर झाले. 100 कोटींच्या खंडणीप्रकरणी त्यांची चौकशी सध्या सुरू आहे. सुभाष चंद्र आणि पुनित गोएंका यांना गुरुवारी दिल्ली कोर्टाने अंतरिम जामीन दिला होता. पण उद्योगपती नवीन जिंदल यांच्याकडून 100 कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी झीचे दोन संपादक समीर अहलुवालिया आणि सुधीर चौधरी यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.

close