कांदिवलीत दोन तरूणींवर किटकनाशक औषध फेकले

December 11, 2012 10:03 AM0 commentsViews: 19

11 डिसेंबर

मुंबई :- कांदिवलीमध्ये दोन महिलांवर किटनाशक औषध हल्ला झालाय. या तरूणींना नजीकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून हल्लेखोर सचिन शिगवण याला अटक करण्यात आली आहे. आज सकाळी कांदिवली इथल्या हनुमान नगरमध्ये ही घटना घडली. सचिन शिगवण याने या दोघींच्या चेहर्‍यावर झुरळ मारण्याचं औषध फेकलं. एकतर्फी प्रेमप्रकरणातून हल्ला केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून सचिन शिगवण याला अटक करण्यात आलीय.

close