‘FDI’चा मार्ग मोकळा;राज्यसभेतही मंजुरी

December 7, 2012 9:44 AM0 commentsViews: 20

07 डिसेंबर

यूपीए सरकारनं थेट परकीय गुंतवणुकीचा संसदेतला लढा अखेर जिंकलाय. यामुळे रिटेलमध्ये FDIचा मार्ग आता मोकळा झालाय. लोकसभेपाठोपाठ आज राज्यसभेतही एफडीआयचा प्रस्ताव बहुमातानं मंजूर झाला आहे. एफडीआयच्या बाजूनं 123 मतं पडली तर एफडीआयच्या विरोधात 102 मतं पडली.तर एकोणीस जणांनी मतदान केलं नाही. राज्यसभेचा हा अंतिम निकाल रात्री उशिरा जाहीर करण्यात आला. दोन दिवसांच्या चर्चेनंतर आज राज्यसभेत मतदान घेण्यात आलं. पण मतदानावेळी काही खासदारांच्या मशिन्स बंद होत्या. त्यामुळे त्यांचं मत नोंदवण्यात आलं नाही. या गोंधळामुळे पुन्हा एकदा मतदान घेण्यात आलं. मतदानाआधी समाजवादी पक्षाच्या खासदारांनी सभात्याग केला. तर बसपाच्या खासदारांनी सरकारच्या बाजूनं मतदान केलं. सरकारला साथ देणार्‍या मायावतींना सरकारनं बक्षीसही दिलंय. बढतीत आरक्षण विधेयक सोमवारी राज्यसभेत मांडलं जाणार आहे. मायावतींचा या विधेयकासाठी आग्रह होता. संयुक्त जनता दलाचे खासदार उपेंद्र कुशवाहा यांनी पक्षाच्या भूमिकेच्या विरोधात जात FDI च्या बाजूनं मतदान केलं. त्यांच्यावर योग्य कारवाई करू, असं पक्षाध्यक्ष शरद यादव यांनी सांगितलंय. दरम्यान, या विजयानंतर यूपीएच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे.आर्थिक सुधारणांचा गाडा आता रुळावर आल्याची प्रतिक्रिया संसदीय कामकाज मंत्री कमलनाथ यांनी दिलीय. आर्थिक सुधारणांना मिळणार वेग ?- बँकिंग सुधारणा आणि पेंशन विधेयक- रेल्वेत अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी भाडेवाढ- पायाभूत क्षेत्रात सुधारणा- वाहतूक क्षेत्राचं आधुनिकीकरण- खत सबसिडीत सुधारणा- कंपनी कायदा अधिक पारदर्शक करण्यासाठी सुधारणा- ऊर्जा क्षेत्रात सुधारणा

close