26/11 च्या रिपोर्टिंगला फॉरेन मीडियाचीही उपस्थिती

December 3, 2008 6:02 PM0 commentsViews: 9

3 डिसेंबर, मुंबई शिल्पा गाड अतिरेकी हल्ल्यानंतर मुंबई आता हळूहळू सावरतेय. या सगळ्या हल्ल्यांच्या रिपोर्टिंगच्यावेळी भारतीय प्रसारमाध्यमांच्या बरोबरीनं परदेशी मीडिया होता. रॉयटर्स, सीएनएन, बीबीसी न्यूज, फॉक्स, एबीएन, वायर गॅदरिंग परदेशी प्रसारमाध्यातली ही काही दिग्गज नावं. मुंबईवरील अतिरेकी हल्ल्याची या सर्वांनी मोठ्या प्रमाणावर दखल घेतली. गेट वे ऑफ इंडियाच्या समोर तीन-चार दिवस भारतीय प्रसारमाध्यमांच्या बरोबरीनं तेही तळ ठोकून होते. कुवेतमधील अल जझिरा हेही त्यापैकीच एक. यावर अल जझिराच्या असिस्टंट प्रोड्युसर इमाद मुसाद म्हणते, आम्ही इथे आलो ते आमच्या लोकांची स्थिती समजुन घ्यायला. आम्ही इथे आलो तर आम्ही जास्त चांगल्या प्रकारे परिस्थिती समजून घेऊ शकू '. मोठ्या प्रमाणावर फॉरेन मीडियाचे प्रतिनिधी तिथे उपस्थित होते. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे या सगळ्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये महत्वाचं टार्गेट ठरले विदेशी नागरिक. 'आम्हाला वाटतंय की भारत आणि आम्ही आता एकाच नावेतून प्रवास करतोय. या हल्ल्यानं हे सिद्ध केलंय ', असं फ्रेंच रिपोर्टर अलेक्झांड्रा सांगत होती. जशी अमेरिकेतील 9 /11 च्या हल्ल्याची जगभर दखल घेतली गेली. तशीच मुंबईतील 26/ 11 च्या हल्ल्याचीही घेतली गेली.

close