शिक्षिकेनं विद्यार्थ्याला चिमटे काढून केलं जखमी

December 13, 2012 5:21 PM0 commentsViews: 10

13 डिसेंबर

शिक्षिकेनं विद्यार्थ्याला चिमटा काढल्यामुळे विद्यार्थी जखमी झाल्याची घटना नवी मुंबईत घडली. कोपरखैरणेमधील क्रिस्ट ऍकॅडमीमध्ये हा प्रकार घडला. सातवीमध्ये शिकणार्‍या या विद्यार्थ्याला एका गैरहजर विद्यार्थ्याचं भाषण करण्याची जबरदस्ती या शिक्षिकेनं केली. पण असं अचानक आपल्याला हे भाषण करता येणार नाही असं या विद्यार्थ्यानं सांगितलं. यावर संतापलेल्या शिक्षिकेनं विद्यार्थ्याला मारहाण केली आणि त्याच्या दोन्ही हातावर चिमटे काढले. यामुळे हा विद्यार्थी या ऍकॅडमीमध्ये जाण्यास घाबरत आहे. या संदर्भात या विद्यार्थ्याच्या पालकांनी शाळेतील शिक्षिका सरिता हिच्याविरुद्ध कोपरखैरणे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवलाय. मात्र या संदर्भात शाळेतील मुख्याध्यापकांनी बोलण्यास नकार दिलाय.

close