अमेरिकेत माथेफिरू तरुणाचा अंदाधुंद गोळीबार, 27 ठार

December 15, 2012 10:30 AM0 commentsViews: 3

15 डिसेंबर

अमेरिकेतल्या कनेक्टीकट इथल्या एका शाळेत काल शुक्रवारी थरकाप उडवणारी घटना घडलीय. न्यूटाऊन मधल्या सँडी हूक एलिमेंटरी शाळेत एका हल्लेखोरानं अंदाधुंद गोळीबार केला. त्यात वीस विद्यार्थ्यांसह सत्तावीस जणांचा मृत्यू झाला. 20 वर्षांच्या ऍडम लँझा या माथेफिरूनं हा हल्ला केल्याचं उघड झालंय. या हल्ल्यात त्याचाही मृत्यू झालाय. शाळेतल्या विद्यार्थ्यांवर आणि नंतर शिक्षकांवर त्यानं गोळीबार केला. ऍडमनं शंभरहून अधिक गोळ्या झाडल्याचं पोलिसांनी सांगितलंय. पोलिसांनी त्याच्याकडून तीन शस्त्रं हस्तगत केली. त्यातली दोन त्याच्या आईच्या नावावर आहेत. धक्कादायक म्हणजे तिच्या आईचाही एका वेगळ्या घटनेत याच वेळी मृत्यू झालाय. गोळीबारानंतर पोलिसांनी ऍडमच्या भावाला ताब्यात घेतलं होतं. पण चौकशी केल्यानंतर त्याला सोडून देण्यात आलं.

close