विधानभवनावर भाजपचा धडक मोर्चा

December 11, 2012 10:22 AM0 commentsViews: 3

11 डिसेंबर

सिंचन घोटाळा, पाणी, महागाई अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाजपने विधानभवनावर मोर्चा काढला आहे. रेशीमबाग मैदान ते विधानभवन असा हा मोर्चा काढलाय. मोर्चाला राज्यभरातून भाजपचे कार्यकर्ते आणि नेते सहभागी झालेत. या मोर्चाला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी, भाजपचे उपनेते गोपीनाथ मुंडे, प्रकाश जावडेकर, सुधीर मुनगंटीवार एकनाथ खडसे, विनोद तावडे सहभागी झाले आहे. या शिवाय भाजपचे अनेक आमदार, खासदार उपस्थित आहेत. या मोर्चाला 30 हजार कार्यकर्ते उपस्थित आहेत. मोर्चा विधानभवन परिसरात आल्यावर नितीन गडकरी या मोर्चाला संबोधित करणार आहेत.

close