अतिक्रमण कार्यालयावर तो हल्ला शिवसैनिकांचा

December 12, 2012 12:17 PM0 commentsViews: 8

12 डिसेंबर

मुंबईत सोमवारी रात्री वरळी इथं मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागाच्या कार्यालयावर शिवसैनिकांनी हल्ला केल्याच उघड झालंय. यात वरळीच्या गौतम मर्चंडे या शिवसेना शाखाप्रमुखासह पाच शिवसैनिकांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना उद्या कोर्टात हजर केलं जाणार आहे. सोमवारी रात्री 20 ते 25 जणांच्या जमावानं ऑफिसची तोडफोड केली, तसंच इथं असलेल्या तीन कर्मचार्‍यांनाही मारहाण केली. तर अत्यावश्यक सेवेतील पाच गाड्यांची तोडफोड केली. पण त्यांनी हा हल्ला का केला हे अजून समजू शकलेलं नाही.

close