अंधांसाठीचा टी-20 वर्ल्ड कप भारताने जिंकला

December 13, 2012 5:30 PM0 commentsViews: 4

13 डिसेंबर

अंधांच्या टी-20 क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत भारतानं जेतेपद पटकावलंय. फायनलमध्ये भारतानं पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 29 रन्सनं पराभव केला. पहिली बॅटिंग करणार्‍या भारतानं 258 रन्स केले. केतन पटेलनं फक्त 43 बॉलमध्ये 98 रन्स करत भारताला भक्कम स्कोर उभा करुन दिला. याला उत्तर देताना पाकिस्तानला 7 विकेट गमावत 229 रन्सच करता आले. पंकज भुईनं भारतातर्फे सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. बंगलोरमध्ये झालेल्या या स्पर्धेला क्रिकेटप्रेमींचाही तुफान प्रतिसाद मिळाला.

close