पिछाडी सुटेना, आघाडी जमेना

December 15, 2012 11:56 AM0 commentsViews: 4

15 डिसेंबर

दोन कसोटीत पराभवानंतर भारतीय टीमची धडपड सुरुच आहे. आज नागपूर टेस्टमध्ये कॅप्टन धोणी आणि विराट कोहलीच्या संयमी बॅटिंगनंतरही तिसर्‍या दिवसअखेर भारताला आघाडी घेता आलेली नाही. कोहली आणि धोणीच्या भक्कम पार्टनरशिपच्या जोरावर भारतानं तिसर्‍या दिवसअखेर 8 विकेट गमावत 297 रन्स केलेत.

पहिल्या इनिंगमध्ये भारत अजून 33 रन्सनं पिछाडीवर आहे. विराट कोहलीनं शानदार सेंच्युरी केली, पण यानंतर तो लगेचच आऊट झाला. तर महेंद्रसिंग धोणीची सेंच्युरी मात्र अवघ्या 1 रननं हुकली. टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण करणार्‍या रविंद्र जडेजाला मात्र मोठा स्कोर करता आला नाही. 12 रन्सवर अँडरसननं त्याची विकेट घेतली. नवव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या पियुष चावलाला केवळ 1 रन करता आला. ग्रॅमी स्वानन त्याला क्लिन बोल्ड केलं.

दरम्यान, काल शुक्रवारी टेस्टच्या पहिल्या दिवशी भारताचे दिग्गज बॅट्समन पुन्हा एकदा फ्लॉप ठरले. भारताची 87 रन्सवर 4 विकेट अशी अवस्था होती. वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, चेतेश्वर पुजारा आणि सचिन तेंडुलकर हे प्रमुख बॅट्समन झटपट आऊट झाले. त्याआधी तळाच्या बॅट्समननं केलेल्या झुंजार बॅटिंगच्या जोरावर इंग्लंडनं पहिल्या इनिंगमध्ये 330 रन्स केले. आता मॅचच्या चौथ्या दिवशी भारत आघाडी घेणार का, याकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलंय.

close