जळगावात पाझर तलावासाठी गावकर्‍यांचं आमरण उपोषण

December 11, 2012 10:57 AM0 commentsViews: 2

11 डिसेंबर

जळगाव जिल्ह्यातल्या पारोळा तालुक्यात 11 गावांसाठी महत्त्वाच्या असलेल्या लोणी गावातील लघुसिंचनाच्या पाझर तलावाचं काम 29 वर्षांपासून रखडलंय. हे काम पूर्ण करण्याच्या मागणीसाठी गावातल्या शेतकर्‍यांनी आपल्या कुटुंबासह आमरण उपोषण सुरू केलंय. या पाझर तलावाला 1983 मध्ये मान्यता मिळाली होती. आणि त्याचं 90 टक्के काम पूर्णही झालं होतंं. पण गेल्या 25 वर्षांपासून मात्र उरलेलं काम अपूर्णावस्थेत आहे. वेळोवेळी आश्‍वासनं देऊनंही या कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे या 11 गावांना अजूनही पाणीटंचाईला सामोरं जावं लागत आहे. त्यामुळे गावकर्‍यांनी अखेर आमरण उपोषणाचं हत्यार उपसले आहे.

close