‘ते’ वक्तव्य लालफितीच्या कारभारवर : टाटा

December 8, 2012 4:39 PM0 commentsViews: 5

08 डिसेंबर

पण टाटा यांचा पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर टीका करण्याचा नव्हे तर लालफितीच्या कारभारावर बोट ठेवण्याचा टाटा यांचा प्रयत्न होता असं स्पष्टीकरण टाटा सन्सनं दिलंय. दरम्यान मुलाखतीत सरकाच्या बाबतीत जी काही भडक शब्द वापरलेत ते प्रकाशनाचे असल्याचंही टाटा सन्स यांनी म्हटलंय. फायनान्शील टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत प्रशासकीय अधिकार्‍यांच्या लालफितीच्या कारभारावर रतन टाटा यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यांच्या या वक्तव्यानंतर प्रसिद्धी माध्यमांमधून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. त्यानंतर रतन टाटा यांच्या वक्तव्यावर टाटा सन्सनं स्पष्टीकरण दिलंय. दरम्यान, कंपनी अफेअर्स मंत्री सचिन पायलट यांनी मात्र टाटांचे आरोप फेटाळलेत. सरकार देशाच्या विकासासाठी मेहनत घेत असल्याचं त्यांनी म्हटलंय.

रतन टाटांनी मुलाखतीत काय म्हटलं होतं ?

आमच्या देशातलं पंतप्रधान कार्यालय एक गोष्ट सांगतं आणि त्याच विषयावर एखादा मंत्री दुसरी भूमिका मांडतो. पण हे इतर देशांमध्ये फारसं होत नाही. एखादा स्टील प्लँट उभारण्यासाठी तुम्ही सात ते आठ वर्षं वाट पाहू शकत नाहीत.

close