नागपुरात अल्पवयीन अंधमुलीवर बलात्कार

December 13, 2012 5:50 PM0 commentsViews: 13

13 डिसेंबर

नागपूरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी दुदैर्वी घटना घडली आहे. एका 12 वर्षांच्या अल्पवयीन अंधमुलीवर एका नराधामाने पाशवी बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. शहरातील गिट्टीखदान भागातील वसाहतीत राहणार्‍या मुलीवर त्यांच्याच घरात राहणार्‍या भाडेकरू अजय तेलगोटे नावाच्या तरूणाने बलात्कार केला. तेलगोटे हा एअरफोर्समध्ये सफाई कर्मचारी आहे. पीडित मुलीची आई कामानिमित घराबाहेर गेल्याची संधी साधून तेलगोटे यांने बलात्कार केला. घरी परतल्यानंतर पीडितमुलीने आपल्यासोबत घडलेली हकीकत आईला सांगितली. त्यानुसार तिच्या आईने पोलिसात तक्रार दाखल केली असून अजय तेलगोटेला अटक करण्यात आली आहे.

close