पुण्यात आजपासून घुमणार सूर सवाईचे

December 11, 2012 11:16 AM0 commentsViews: 1

11 डिसेंबर

सवाई गंधर्व महोत्सवला आजपासून सूरु होणार आहे. यंदाचं हे हीरक महोत्सवी वर्ष आहे. यावेळी महोत्सव सहा दिवसांचा असून गुरू शिष्य परंपरा ही या वर्षीची थिम आहे. दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे सनईवादनाने महोत्सवाला सुरुवात होईल. अश्विनी आणि संजीव शंकर यांचं सनईवादन होईल. यापाठोपाठ मिना फातरफेकर त्यानंतर पद्मा देशपांडे यांचं गायन होईल. पंडित शिवकुमार शर्मा यांचे शिष्य आणि मुलगा राहुल शर्मा संतूर वादन सादर करतील आणि पंडित जसराज यांच्या गायनाने दिवसाचा समारोप होईल.

close