भाजपला उत्तर देण्यास राष्ट्रवादीची उद्या ‘सत्यपत्रिका’

December 12, 2012 4:37 PM0 commentsViews: 3

12 डिसेंबर

भाजपच्या काळ्या पत्रिकेला राष्ट्रवादीनं तसंच उत्तर देण्याचा निर्णय घेतला आहे. गुरूवारी सकाळी साडे दहा वाजता राष्ट्रवादी काँग्रेस सत्यपत्रिका प्रकाशित करणार आहे. 'भ्रष्टाचाराचे घाव, एक राजकीय डाव', असं या पत्रिकेचं नाव आहे. या सत्यपत्रिकेत सर्व आरोपांचं खंडन करण्यात आलंय. तसंच खासकरून भाजपच्या नेत्यांवर या सत्यपत्रिकेत तोफ डागण्यात आली आहे.

मधुकरराव किंमतकर यांनी काढली 'पिवळी पत्रिका'

दरम्यान, सिंचनाची श्वेतपत्रिका, त्यानंतर काळीपत्रिका याच्यानंतर आता सिंचनाची पिवळी पत्रिकाही निघालीय. माजी राज्यमंत्री आणि विदर्भातले नेते मधुकरराव किंमतकर यांनी सिंचनाची पिवळी पत्रिका काढलीय. सिंचनावरच्या श्वेतपत्रिकेतल्या उणिवांवर यात बोट ठेवण्यात आलाय. विदर्भातल्या वाढत्या अनुशेषाबद्दल सरकारवर टीका करण्यात आली आहे.

close