भज्जी,युवी आणि झहीर आऊट;आवना इन

December 9, 2012 9:30 AM0 commentsViews: 7

09 डिसेंबर

नागपूर येथे होणार्‍या चौथ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय टीमची आज निवड करण्यात आली. या कसोटीत हरभजन सिंग, युवराज सिंग आणि झहीर खानला बाहेर बसवण्यात आलं आहे. तर दिल्लीचा खेळाडू परविंदर आवनाला संधी देण्यात आली आहे. तसेच टीममध्ये रवींद्र जडेजा, पियूष चावला यांनाही संधी देण्यात आली आहे. कप्तान महेंद्रसिंग धोणीकडे कर्णधार पद कायम आहे. तसेच कसोटीनंतर होणार्‍या दोन टी-20 मॅचेसाठीही हीच टीम असणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय.

अशी आहे भारतीय टीम महेंद्र सिंग धोणी, सचिन तेंडुलकर, रवींद्र जडेजा, पियूष चावला, विराट कोहली,आर.आश्विन, ईशांत शर्मा, अजिंक्य रहाणे, विरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर,प्रज्ञान ओझा, अशोक डिंडा, परविंदर अवाना,चेतेश्वर पुजारा.

close