12-12-12 ला लोडशेडिंगमुक्त घोषणेचे वाजले बारा

December 11, 2012 5:41 PM0 commentsViews: 27

आशिष जाधव, नागपूर

11 डिसेंबर

12 डिसेंबर 2012 या दिवशी राज्य लोडशेडिंगमुक्त होईल, अशी घोषणा अजित पवारांनी केली होती. पण 12-12-12चा मुहूर्त टळून गेल्यावरही राज्यातला अंधार दूर होणार नाही अशीच परिस्थिती आहे. राज्य लोडशेडिंगपासून मुक्त करण्याचा सत्ताधार्‍यांचा मनसुबा होता. तसे प्रयत्नही झाले पण महावितरण कंपनीच्या विरोधामुळं राज्य पूर्णपणे लोडशेडिंगमुक्त होऊ शकत नाहीय. राज्यातल्या जवळपास संपूर्ण ग्रामीण भागात 12 ते 16 तास लोडशेडिंग आहे. मुंबई, पुणे, नागपूर आणि कोकण वगळता शहरी भागातल्या जनतेलाही लोडशेडिंगचा फटका बसतोय.

गेली अनेक वर्ष लोडशेडिंगमध्ये होरपळणार्‍या जनतेला लोडिशेडिंगमुक्तीची अनेकदा स्वप्नं दाखवण्यात आली. एवढंच नाहीत तर ऊर्जा खातं सांभाऴणार्‍या राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून लोडशेडिंग मुक्तीसाठी शरद पवाराच्या जन्मदिनाचा मुहूर्तही मुक्रर करण्यात आला. पण हे लोडशेडिंगचं स्वप्नं स्वप्नंच ठरतंय. अजूनही राज्यातल्या अनेकभागातला अंधार दूर झालेला नाही. कुठे घोषीत तर कुठं अघोषित लोडशेडिंग सुरुच आहे. राज्यातील सध्याची विजेची तूट बघता महावितरण कंपनी सहज खासगी वीज घेऊन राज्य लोडशेडिंगमुक्त करु शकते. पण ज्या ठिकाणी विजेची चोरी जास्त आहे अशा फिडरवर लोडशेडिंग केलं जातंय. राज्य सरसकट लोडशेडिंगमुक्त करायचं असेल तर महावितरण कंपनीला महिन्याला साठ कोटी रुपये खर्च करावे लागणार आहे. पण महानिर्मिती कंपनीची साडेतीन हजार कोटींची थकबाकी महावितरणकडे आहे. तर महापारेषण कंपनीची 120 कोटी रुपयांची थकबाकी महावितरणकडे आहे. आधीच एवढी थकबाकी असताना आणखी खासगी वीजेचा बोजा का उचलायचा अशी भूमिका घेत महावितरण कंपनीच्या व्यवस्थापनानं सरकारला पूर्णपणे लोडशेडिंगमुक्त नकार दिलाय. ही बाब राज्यकर्त्यांनाही पटलीय.पण वीजखात्यातल्या गैरकारभारामुळं लोडशेडिंग कायम असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. ऐन हिवाळ्यात ही परिस्थिती आहे तर उन्हाळ्यात ही परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. महावितरण कंपनीच्या गैरकारभारामुळं महाराष्ट्राच्या माथी लोडशेडिंग लादलं जातंय हेच खरं.. फिटेना अंधाराचे जाळे

सरसकट लोडशेडिंगमुक्त करणं खर्चिकमहावितरणला महिन्याला साठ कोटींचा खर्च अपेक्षितमहानिर्मितीची महावितरणकडे रु. 3500 कोटींची थकबाकी महापारेषणची महावितरणकडे रु. 120 कोटींची थकबाकी खासगी वीज घ्यायला महावितरण कंपनीचा नकार

राज्यात लोडशेडिंगवर एक नजर

मराठवाडयातल्या ग्रामीण भागामध्ये कुठे 9 तास तर कुठे 12 तास लोडशेडिंग आहे. पण ही वेळही पाळली जात नाही. कधी कधी तर दोन दोन दिवस विजेचा पत्ता नसतो. महाराष्ट्राला 1160 मेगावॅट वीज देणारा परळीचं औष्णिक विदयुत केंद्रही पाण्याशिवाय बंद पडणार आहे. नागपूर शहरामध्ये घोषित लोडशेंडीग नाही इथ काही तांत्रिक बाब असल्यानंतर दोन तास लोडशेडीग होते तर ग्रामीण भागात 4 तास लोडशेंडीग आहे वर्धा 4 तास शहर 6 तास ग्रमाणी यवतमाळ 4 तास शहर 6 ते 8 तास ग्रामीण अमरावती 4 तास शहर 6 तास ग्रामीण बुलढाणा 6 तास शहर 8 तास ग्रमीणी चंद्रपूर 5 तास शहर 6 तास ग्रमीण

कोल्हापूर शहरात 0 टक्के भारनियमन आहे मात्र इतर 12 तालुक्यांमध्ये 8 ते 10 तास भारनियमन त्यामुळं या भारनियमनाचा फटका छोट्या मोठ्या उद्योगधंद्यांवर होतोय.

सातारा शहरात लोडशेडिंग नाही कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरलंय. येत्या पावसाळ्यापर्यंत इथं वीजनिर्मिती सुरु राहणार आहे पण ग्रामीण भागात 10 तासांपर्यंत लोडशेडिंग आहे.सांगली – मंत्र्यांचा जिल्हा अशी ओळख त्यामुळं शहरात कमी लोडशेडिंग असून मात्र ग्रामीण भागात 6 ते 8 तासांचे लोडशेडिंग

रत्नागीरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या तरी भारनियमन मुक्त आहेत. वीजेची मागणी आणि वसुलीचं प्रमाण हे समाधानकारक असल्यानं हे लोडशेडिंग टळलं आहे.

close