दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणी एकाला अटक, 4 जण ताब्यात

December 18, 2012 10:41 AM0 commentsViews: 2

18 डिसेंबर

राजधानी दिल्लीत रविवारी रात्री चालत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार प्रकरणी पोलिसांनी बस ड्रायव्हरला अटक केलीय आणि चार जणांना ताब्यात घेतलंय. आज सर्व आरोपींना साकेत कोर्टात हजर केलं जाणार आहे. दरम्यान, मेडिकलच्या या विद्यार्थीनीला लाइफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आलंय. तिच्यावर उपचार सुरू आहेत. तिच्या मित्राने दिलेल्या माहितीनुसार दिल्ली पोलिसांना 12 बसमालकांची चौकशी केली होती. तसेच ज्या बसमध्ये बलात्कार झाला होता ती बस पर्यटक बस होती. दिल्ली पोलिसांनी याबाबत काल सीसीटीव्ही फूटेज सुद्धा जारी केले होते त्यामुळे बसचालक आणि इतर आरोपींना पकडण्यात यश आलंय. तर दुसरीकडे बलात्कार प्रकरणाच्या निषेध म्हणून महिला संघटना आता रस्त्यावर उतरल्या आहेत. पोलीस स्टेशन बाहेर पोलीस प्रशासनाच्या विरोधातही निदर्शनं करण्यात आली.

close