बढतीत आरक्षण विधेयकाबाबत सरकार गंभीर नाही -मायावती

December 12, 2012 4:49 PM0 commentsViews: 3

12 डिसेंबर

पदोन्नतीत आरक्षण विधेयकाबद्दल सरकार गंभीर नसल्याचा आरोप आज बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनी केला. राज्यसभेचे सभापती हमीद अन्सारी यांनाही मायावतींनी खडे बोल सुनावले. सभागृहाचं कामकाज सुरळीत चालावं ही सभापतींची जबाबदारी असते. पण हमीद अन्सारी वेळोवेळी कामकाज तहकूब करत असल्याचा आरोप त्यांनी केला. सभागृहात कामकाजच होणार नसेल, तर आपल्याला कठोर पाऊल उचलावं लागेल असा इशाराही त्यांनी दिला. प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान होणार गदारोळ आणि त्यानंतर कामकाज तहकूब करणं हा आरक्षण विधेयकाच्या मार्गात अडथळा आणण्याचाच प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप मायावतींनी केलाय.

close