जनतेची प्रश्न वार्‍यावर, विधानसभेचं कामकाज ठप्प

December 14, 2012 10:23 AM0 commentsViews: 3

14 डिसेंबर

नागपूर हिवाळी अधिवेशनाचा आजचा दिवसही वाया गेला. आजही विधानसभेचं कामकाज ठप्प झालंय. सिंचन घोटाळ्याची एसआयटीमार्फेत चौकशी करण्याच्या मागणीसाठी भाजपनं विधानसभेचं कामकाज पहिल्या आठवड्यात होऊ दिलेलं नाही. त्यामुळं राष्ट्रवादीनं आज विधानभवनाच्या पायर्‍यांवर भाजप विरोधात आंदोलन केलं. भाजप चर्चेला घाबरत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीच्या आमदारांनी घोषणाबाजी केली. गेला आठवडाभर पहिले अजित पवारांच्या शपथविधी, अविश्वास प्रस्ताव, श्वेतपत्रिकाबाबत विरोधक आणि सत्ताधार्‍यांनी प्रचंड गोंधळ घातला. या गोंधळात मात्र जनतेच्या प्रश्नांची राखरांगोळी झाली.

close