श्वेतपत्रिकेची होळी करा-मुंडे

December 11, 2012 1:03 PM0 commentsViews: 3

11 डिसेंबर

ज्या मंत्रालयात हे सत्ताधारी बसतात त्याच मंत्रालयाला आग लागली आता ही आग लागली की लावण्यात आली या प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडे नाही कारण भ्रष्टाचार दाबण्यासाठी मंत्रालयात आग लावण्यात आली अशी घणाघाती टीका भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी केली. तसेच सरकारनं सिंचनावर काढलेल्या श्वेतपत्रिकेची होळी करा असं आवाहन गोपीनाथ मुंडेंनी दिले. तर वॉलमार्टनं पुरवलेले 'एफडीआय'चे 125 रुपये कुठं गेले याची चौकशी व्हायला हवी अशी मागणी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी केली आहे. आज नागपूरमध्ये भाजपचा विराट मोर्चा निघाला. सिंचन घोटाळा, पाणी, महागाई अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी बोलताना भाजपच्या नेत्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर तोफ डागली.

close