वॉलमार्ट लॉबिंग प्रकरणाची न्यायाधीशांमार्फत चौकशी

December 12, 2012 4:56 PM0 commentsViews: 8

12 डिसेंबर

वॉलमार्टच्या लॉबिंग प्रकरणावर आजही संसदेत गदारोळ झाला. या प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याचं आश्वासन संसदीय कामकाज मंत्री कमलनाथ यांनी दिलंय. दरम्यान, लॉबिंगबाबतच्या अहवालात भारत सरकार किंवा त्यांच्या अधिकार्‍यांचा कुठेही उल्लेख नसल्याचं स्पष्टीकरण भारती वॉलमार्टनं दिलं आहे. वॉलमार्टला भारतात प्रवेश मिळावा म्हणून वॉलमार्टने अमेरिकेत लॉबिंगवर जवळपास 125 कोटी खर्च केल्याचं उघड झालंय. अमेरिकेतील खासदारांची मतं अनुकुल करण्यासाठी वॉलमार्टनं पैसे खर्च केले. वॉलमार्टनं नुकतचं सादर केलेल्या रिपोर्टमध्य या एका वर्षात लॉबिंगवर 10 कोटी खर्च केल्याचं सांगितलंय. त्यामुळे या सगळ्या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी भाजप आणि डाव्या पक्षांनी केली होती.

close