अजित पवारांचा शपथविधी घटनाबाह्य -खडसे

December 10, 2012 9:37 AM0 commentsViews: 5

10 डिसेंबर

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या शपथविधीवरुन वाद कायम आहे. अधिवेशनाची सुरुवातच अजित पवारांच्या पुनगरामनाबाबत विरोधकांनी केलेल्या गोंधळानं झाली. उपमुख्यमंत्रीपद घटनात्मक नाही. त्यामुळे अजित पवारांचा शपथविधी घटनाबाह्य आहे. यावर सरकारची भूमिका काय असा सवाल विरोधी पक्षनेते एकनाथ खडसेंनी केला. यानिमित्ताने विधानसभेत या प्रश्नावर वादळी चर्चा झाली. अखेर अध्यक्षांनी या वादावरचा निर्णय राखून ठेवत. शोक प्रस्तावाच्या चर्चेला सुरुवात केली. असाच प्रकार विधान परिषदेतही झाला. तिथेही खडाजंगी झाली. शेवटी सभापतींनी हस्तक्षेप करत अजित पवारांची सभागृह नेता म्हणून मुख्यमंत्र्यांनी नियुक्ती केली आहे. असं म्हणत वादावर पडदा टाकला. पण विरोधकांनी सभात्याग करत आपला निषेध नोंदवला.

close