कुकडी धरणाच्या पाणी वाटपात नगरवर अन्याय -विखे पाटील

December 14, 2012 10:47 AM0 commentsViews: 51

14 डिसेंबर

एकीकडे सिंचन घोटाळ्यावरुन भाजप राष्ट्रवादी संघर्ष पेटला असताना पाणी प्रश्नावर काँग्रेस नेत्यांनी आता पाटबंधारे खातं ताब्यात असलेल्या राष्ट्रवादीवर टीका केली. कुकडी धरणाचं पाणी पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांना समसमान वाटप करण्याचं ठरलं असतानाही नगरला पाणी दिलं जात नसल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे पाटील यांनी केलाय. तसंच पाणी नगरला मिळत नाही यात राजकारण होतंय. एकनाथ खडसे कुठल्याही पक्षाचे असो मात्र पाण्याबाबत त्यांनी मंत्रीपदाच्या काळात जे निर्णय घेतले ते योग्य होते. दुष्काळाचं राजकारण होतंय हे महाराष्ट्राचं दुर्देव असल्याची खंत बाळासाहेब विखे पाटलांनी व्यक्त केली.

close