कॉलेजच्या स्ट्राँग रूममधून विद्यार्थ्यांचे 200 मोबाईल लंपास

December 11, 2012 1:28 PM0 commentsViews: 3

11 डिसेंबर

नाशिकमध्ये के.के. वाघ इंजिनियरिंग कॉलेजच्या स्ट्राँग रूममधून विद्यार्थ्यांचे 200 मोबाईल चोरीला गेल्याची घटना घडली आहे. इंजिनियरिंगच्या दुसर्‍या वर्षाची परीक्षा सध्या सुरू आहे. नेहमीप्रमाणे परीक्षा हॉलमध्ये जाण्याअगोदर विद्यार्थ्यांनी आपले मोबाईल फोन स्ट्राँग रूम मध्ये जमा केले. चोराने याच संधीचा फायदा घेत स्ट्राँग रूममधून 200 मोबाईल फोन लंपास केले. या प्रकरणी कॉलेजने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. मात्र परीक्षेच्या काळात मोबाईल फोन आणण्यास मनाई असल्यामुळे याला कॉलेज जबाबदार नाही अशी भूमिका कॉलेजच्या व्यवस्थापनाने घेतली आहे.

close