जादूटोणा प्रतिबंधक विधेयक पुन्हा बारगळलं

December 18, 2012 10:55 AM0 commentsViews: 133

18 डिसेंबर

गेली अनेक वर्ष प्रलंबित असलेलं अनिष्ट प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक विधेयक पुन्हा बारगळलंय. गेल्या तीन अधिवेशानापासून हे विधेयक मांडलं जाणार अशाच बातम्या येताहेत पण प्रत्यक्षात या विधेयकाची प्रत तयार झालेली नाही. तसंच एकदा मांडलेलं कुठलंही विधेयक वर्षभराचा काळ उलटल्यानंतर ते बाद होतं. त्यासाठी विधेयकात दुरुस्ती करून ते नव्यानं विधानसभेत मांडण्याची गरज आहे. पण या प्रक्रियेस विलंब झालेला आहे अशी धक्काबादक माहिती समोर आलीय. सोमवारी विधानसभेत हे विधेयक मांडलं जाणार होतं. तसं कामकाज पत्रिकेत नमूदही करण्यात आलं होतं. पण विधेयकाचा मसुदाच तयार झाला नसल्यामुळं हे विधेयक मांडलं गेलं नाही.

close